- स्थान: पालकरवाडी हे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे.
- प्रशासकीय माहिती: पालकरवाडी ग्रामपंचायत वेंगुर्ला पंचायत समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.
- आकर्षण: पालकरवाडी ग्रामपंचायतीच्या प्रमुख आकर्षणांपैकी गिरोबा मंदीर, श्री. बाळकृष्ण गणपती गाडगीळ यांची बाग आहे.
- उद्योगधंदे: शेती, गृह उदयोग, दुकान व व्यापारी व्यवसाय.
पालकरवाडी गावाची माहिती
कोकणच्या निसर्गरम्य भूमीवर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेल्या वेंगुर्ले तालुक्यात पालकरवाडी हे एक छोटेसे गाव आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील पालकरवाडी हे छोटेस गाव. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे गाव अतिशय स्वच्छ, संदर व रमणीय असे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे येथे सर्व लोकांमध्ये एकात्मता, आत्मीयता, तसेच समभाव दिसून येतो. पालकरवाडी ग्रामपंचायतच्या स्थापनेपुर्वी हा भाग वेतोरे ग्रामपंचायत मध्ये समाविष्ठ होता. त्यामूळे पालकरवाडी ग्रामस्थांना आवश्यक त्या कामासाठी सुमारे ३ कि .मी. पर्यंत वेतोरे येथे जावे लागे. म्हणून पालकरवाडी गावातील ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न करून शासनाकडे विभक्त ग्रामपंचायतची मागणी केली. ०१ फेब्रुवारी १९८९ ला ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन वरचीवाडी वेतोरे आणि पालकरवाडी अशा दोन ग्रामपंचायती निर्माण केल्या.
डोंगर उताराच्या जमिनीमुळे तसेच भरडी जमिनीतही चिबुड, काकडी, तसेच इतर भाजीपाल्याचे मोठया प्रमाणात पीक पालकरवाडीत घेतले जाते. पारंपारिक उत्पन्न घेणारे कष्टाळू शेतकरी या विविध पिकांची विक्री जिल्ह्यासह शेजारील गोवा राज्यातही करतात. भात शेतीबरोबर नारळ-पोपळीच्या बागा आणि आंबा-काजूचे भरघोस उत्पादन गावात मोठया प्रमाणात घेतले जाते. राज्य शासनाचा कृषीविभागाचा वसंतदादा नाईक कृषीभूषण पुरस्कार प्राप्त झालेले श्री. बाळकृष्ण गणपती गाडगीळ याच गावचे.
वेंगुर्ले व कुडाळ हे शहर पालकरवाडी पासून अनुक्रमे १३ व ९ कि. मी. अंतरावर आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणांशी गावाचा संपर्क नियमितपणे असतो. दळणवळणाच्या दृष्टीने सर्व वाडयांमध्ये रस्ते, पथदिवे झाल्याने चांगली सोय झाली आहे.


