पालकरवाडी गावाचा इतिहास

ग्रामपंचायत कार्यालय पालकरवाडी

ता.वेंगुर्ला  जि.सिंधुदुर्ग

स्थापना – १  फेब्रुवारी १९८९

 

 

 

 

 

 

 

ग्रामपंचायत कर्मचारी

 

अ.क्र.

नाव

    हुद्दा

फोन न.

1

श्री.व्ही.जी.सावंत 

ग्रामसेवक

9404749389

2

श्री.योगेश परब

लिपिक

9422311254

3

श्री.कृष्णा महादेव गावडे

शिपाई

9823767401

4

कु. सुप्रिया मंगेश गोसावी

केंद्रचालक

9146913970

 

 

 

 

 

 

पालकरवाडी गावाचा इतिहास

ग्रामपंचायत पालकरवाडी

-: प्रस्तावना :-

              कोकणच्या निसर्गरम्य भूमीवर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेल्या वेंगुर्ले तालुक्यात पालकरवाडी  हे एक छोटेसे गाव आहे ……….   

            वेंगुर्ले तालुक्यातील पालकरवाडी हे छोटेस गाव. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे गाव अतिशय स्वच्छ, संदर व रमणीय असे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे येथे सर्व लोकांमध्ये  एकात्मता, आत्मीयता, तसेच समभाव दिसून येतो. पालकरवाडी ग्रामपंचायतच्या स्थापनेपुर्वी हा भाग वेतोरे ग्रामपंचायत मध्ये समाविष्ठ होता. त्यामूळे पालकरवाडी ग्रामस्थांना आवश्यक त्या कामासाठी सुमारे ३ कि .मी. पर्यंत  वेतोरे येथे जावे लागे. म्हणून पालकरवाडी  गावातील ग्रामस्थांनी  विशेष  प्रयत्न करून शासनाकडे विभक्त ग्रामपंचायतची मागणी केली. ०१ फेब्रुवारी १९८९  ला ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन वरचीवाडी वेतोरे आणि पालकरवाडी अशा दोन ग्रामपंचायती निर्माण केल्या.

            डोंगर उताराच्या जमिनीमुळे तसेच भरडी जमिनीतही चिबुड,काकडी, तसेच इतर भाजीपाल्याचे मोठया प्रमाणात पीक पालकरवाडीत  घेतले जाते. पारंपारिक उत्पन्न       घेणारे कष्टाळू   शेतकरी या विविध पिकांची विक्री जिल्ह्यासह शेजारील गोवा राज्यातही करतात. भात शेतीबरोबर नारळ-पोपळीच्या बागा  आणि आंबा-काजूचे भरघोस उत्पादन गावात मोठया प्रमाणात घेतले जाते. राज्य शासनाचा कृषीविभागाचा वसंतदादा नाईक कृषीभूषण पुरस्कार प्राप्त झालेले श्री. बाळकृष्ण गणपती गाडगीळ याच गावचे.

            वेंगुर्ले  व कुडाळ हे  शहर पालकरवाडी पासून अनुक्रमे 13 व 9  कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणांशी गावाचा संपर्क नियमितपणे असतो. दळणवळणाच्या दृष्टीने सर्व वाडयांमध्ये रस्ते, पथदिवे झाल्याने चांगली सोय झाली आहे.

 

 

Demography

ग्रामपंचायतीची रचना :-

१)    

ग्रामपंचायतीचे नाव

पालकरवाडी

२)  

स्थापना

१ फेब्रुवारी१९८९

३)  

महसुली गावे

पालकरवाडी

४)  

एकूण  वाडया 

०९

५)                         

वार्ड

३

 

 

गावाची  लोकसंख्या  :-     

 

१

 

लोकसंख्या

एकूण लोकसंख्या

१५९७

स्त्रीया

८१७

पुरुष

७८०

२

कुटुंबे

एकूण कुटुंबे

410

दारिद्रय रेषेखालील कुटुंबे

१९५

दारीद्रय रेषेवरील कुटुंबे

१७०

३

गावातील घरे

एकूण घरे

410

कच्ची घरे

79

पक्की घरे

331

 

 

गावाची भौगोलीक स्थिती  :-

 

१

क्षेत्रफळ

पालकरवाडी

७२४.३६.०४ हे.

2

 

लागवडीखालील क्षेत्र

६३९.०९.८२ हे.

3

 

पडीक  पोट खराब  क्षेत्र

२.८७.४२ हे.

4

 

ओलीता  खालील क्षेत्र

६९.४७.३६ हे.

 

 

 

 

 जलसंवर्धन सुविधा :-                   

१

सार्वजनिक  विहीर 

०५

२

खाजगी  विहीर

६४

३

विंधन  विहीर 

०९

४

खाजगी  पंप /इंजिन

१८

५

शेततळी (सार्व. / खाजगी) 

१

६

ल.उ.ज.सि.यो.पं प

०६

७

लघुनळ योजना (वि.पं.)

०७

८

पक्का बंधारा

२

 

 

 

 

 

 दिवाबत्तीची  सोय :-                   रस्त्यावरील दिवाबत्ती खांब  :- ३४

                                                           घरगुती विदयुत  खांब :-

                                                               सौर पथदीप :- 

                                                        

   गावातील  प्रमुख व्यवसाय  :-

१)  शेती  :-    पालकरवाडी  गावातील भात शेती हा खरीप हंगामातील मुख्य व्यवसाय असून तो मोठया प्रमाणावर  केला जातो. त्याचबरोबर चिबुड, काकडी हेही मोठया प्रमाणावर उत्पादित करून  त्याची विक्री केली जाते. तसेच इतरही भाजीपाल्याची  निर्मिती व विक्री  खरीप व रब्बी दोन्ही हंगामात केली जाते. काजू , आंबा यांचे ही भरघोस उत्पादन येथे घेतले जाते. .

२)  गृह उदयोग :-  पालकरवाडी  गावात महिला बचत गट कार्यरत असून सदर गटामार्फत खादयपदार्थ, भाजीपाला    लागवड , काजू युनीट इत्यादी व्यवसाय चालू असून त्यांचे उत्पादन व विक्री मोठया प्रमाणात होते.

३)  दुकान व व्यापारी व्यवसाय :-  पालकरवाडी गावात भुषारी दुकाने , छोटे स्टॉल, हॉटेल इत्यादी कार्यरत  असून त्यांचा  मोठया प्रमाणात व्यवसाय होतो. तसेच मेडिकल्स स्टोअर्स ,गॅरेज इलेक्ट्रिक,   इलेक्ट्रोनिक, कापड  दुकाने,  सौदर्य प्रसाधने, केशकर्तनालय यासारखी दुकाने  आहेत अशा अनेक व्यवसायातून मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती केली  जाते.

 

 

शैक्षणिक  उठाव :-  पालकरवाडी  गावात श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे  ही माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण  संस्था कार्यरत  आहे .शाळेत  मुलांना शिक्षणासंबधी सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध झाल्या आहेत.  गावात सर्व शिक्षा  अभियान राबले गेल्याने गावातील मुलामुलींना शिकण्यासाठी चांगले प्रोत्साहन मिळाले. त्याचबरोबर  प्राथमिक शाळा तीन  असून अंगणवाडया तीन आहेत.  

आरोग्य सुविधा:-    खाजगी दवाखाने दोन आहेत.

 दळणवळण सुविधा  :-   गावात पक्के रस्ते दोन  असून  कच्चे रस्ते आठ  व पायवाट दोन आहेत.

अन्य सुविधा / कार्यालये  :-   

                                 पालकरवाडी  गावात  अन्य सुविधा / कार्यालये पुढील प्रमाणेआहेत .

१)    श्री.सातेरी महिला मंडळ  –

२)    युवक कला क्रिडा मंडळ –

३)    पोस्ट कार्यालय

  

 

संस्कृती  जोपासना :- साधारणत:  मागील ३ ते ४  वर्षापासून  गावातील इच्छुक तसेच उत्साही ग्रामस्थांकडून विविध कार्यक्रम तसेच सणासुदीनां पौराणिक नाटक तसेच सामाजिक,कौटुंबीक, ऐतहासिक,विनोदी नाट्य निर्मिती करून गावाच्या कला गुणांना वाव देण्यात येतो.  गावातील युवक मंडळाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, रक्तदान,नेत्रदान,श्रमदान शिबिरे , शेतकरी शिबिरे विविध सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.

 Paryavaran Santulit Samruddha Gram Yojana

Paryavaran Santulit Samruddha Gram Yojana

Village Panchayat palkarwadi   

                   पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया असून या योजनेतून पर्यावरण संवर्धन, जतन व संरक्षण करुनच समृध्द व संपन्न गावाची निर्मिती करणे, गावांमध्ये उच्च प्रतीच्या भौतिक व मुलभूत सुविधांची निर्मिती करणे, दर्जेदार सामाजिक मुलभूत सुविधा करणे, मुल्यवर्धित स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती करणे, जल, जमीन, जंगल, हवा, वनस्पती यांचे योग्य व्यवस्थापन करुन भौतिक सोयी सुविधांची निर्मिती पर्यावरण संतुलन राखून करणे व त्याव्दारे ग्रामस्थांचा जीवनमान दर्जा सुधारणे, मोठया ग्रामपंचायतीचा पर्यांवरण विकास आराखडा व ग्रामविकास आराखडा तयार करुन शहरी तोडीच्या सुविधा निर्माण करुन त्यांना विकास केंद्र बनविणे.

 

 

 

 

 

 

ग्रा

                             पर्यटनासाठी विविध पिकाने बहरलेली बाग

स्थानिक भागातील नाव :-        खडेसलवाडी

ठिकाण/ वाडी /गाव /तालुका :-     पालकरवाडी ता.वेंगुर्ला

जाण्यासाठी मार्ग : –             कुडाळ रेल्वे स्टेशन अंतर 15 कि.मी.असून

                                     गोवा येथील विमानतळ 120 कि.मी. आहे.

 

         निसर्गाने दिलेले मुक्त उधळण  कोकणामध्ये पालकरवाडी ( वेतोरे गावात खास करुन प्रकर्षाने  पहायला मिळते. दुर्मिळ होत चाललेली वनराई पुरातन वृक्ष व औषधी गुणधर्म असणारे वृक्षवल्ली या भागात बारमाही  दिसते. बारमाही बिबटयाची असणारी उपस्थिती हे या भागाची खासियत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Scroll to Top